Ad will apear here
Next
शाळेच्या वेळेत बस सुरू करण्याची मागणी
नाशिक : विद्या प्रशाला (हायस्कूल) व ज्युनिअर कॉलेज, तळेगांव (अंजनेरी) या विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या वेळेत बस नसल्यामुळे गैरसोय होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत राज्य परिवहन महामंडळाची बस नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थिवर्गाचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे दहेगांव, मुळेगांव परिसरातून सकाळी दहा वाजता व अंजनेरी गावातून शाळेच्या जवळून सायंकाळी पाच वाजता बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन २८ जून रोजी नाशिक येथील राज्य परिवहन आगाराचे व्यवस्थापक राजेश शिलावट यांना देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, मनसे पदाधिकारी सागर कोठावदे, मनसे गणअध्यक्ष संतोष रहाडे , मनसेचे दहेगांवचे कार्याध्यक्ष, अप्पासाहेब रहाडे आदी सहपदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.

शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले असल्यामुळे लवकरात लवकर बस सुरू न झाल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व दहेगांव येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AYSXBD
Similar Posts
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी सदस्यता अभियानांतर्गत नाशिक येथील निफाड तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समता परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दत्ता जाधव, प्रवीण कोल्हे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता जाधव आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर सरचिटणीस प्रवीण कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उप-जिल्हाध्यक्ष तुषार बोबडे, शहराध्यक्ष बाबासाहेब पाठक, उप-शहराध्यक्ष स्वप्निल सोनार,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language